।। नामात एकाच रमावे रम मान
ते नाम आसावे "अनु" नाम
श्वासात असावा सदा एकची गंध
तो गंध असावा "अनु" गंध ।।
।। जिव्हा आमुच्या असावा एकची रस
अन तो असावा फक्त "अनु" रस
रंगात नहावे अमुचे अंग अंग
अन तो रंग असावा "अनु" रंग ।।
।। व्याकुळ नेत्रांनी स्मरीतो तुला
चरण-आतुर हातांनी नमितो तुला
अबीर, गुलाल उधळीतो रंग
सदा घडो हा "अनु" सत्संग ।।
।। भ्रमर होऊनी गुंगावे "अनु " चरणी
गुण गुण गुणावे "अनु" रमणी
चित्ती असावे एकच ध्यान
अनिरुद्धा तव चरणात माझे प्राण ।।
।। निशिगंध होऊनी अर्पितो तुज
चरण कमळ सुंगंध द्यावा मज
शाम निळ्या साद घालतो तुज
अनिरुद्धा तुझे "अनुज्ञ" असावे मज ।।
-अभिजीतसिंह ©