..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Thursday, December 16, 2010

सार्थ मधुफलवाटिका-12 december

" मनुष्य हा मूलत: पान्या सारखा पारदर्शक असतो, परिस्थिति त्या व्यक्तिला त्याच्या विरुद्ध वागन्या लायक प्रवृत्त करते "
आणि त्या "परिस्थिति" चा सामना करण्यासाठी तो मनुष्य तेव्हा वेग वेगळ्या वाटा शोधू लागतो, समोर असंख्य वाटा असताना योग्य त्या वाटेचा माग काढण्यासाठी त्या मनुष्याला मार्गदर्शकाची नितांत गरज भासते, "तो" मार्गदर्शक जेव्हा फुले अंथरलेली योग्य ती वाट दाखवतो, ती असते आपल्या आयुष्यातील "मधुफलवाटिका".
गेल्या एक वर्षापासून आम्ही औरंगाबादकर ज्या क्षणाची वाट बघत होतो, तो क्षण म्हणजे १२ दिसम्बर जसा जसा जवळ येत होता, तस तसे आम्हाला स्फुरण चढात होते, आणि आम्ही आन्खिनच जोमाने कार्य करण्यासाठी धडपडत होतो, लहान असो की मोठा, तरुण की म्हातारा, सर्व जन औस्तुक्तेने वाट बघत होते. आणि आमचे औरन्गाब्द्कर आमच्या कड़े उत्सुकतेने बघत होते, कारण हे सर्व त्यांच्या साठी नवीन होते.
शहराच्या मुख्य रस्त्यांना "शिश्तित" लावलेले होर्डिंग्स या उत्साहामधे आणखीनच भर घालत होते. आम्ही जेव्हा एखाद्या कामा साठी त्या रस्त्यावरून निघायचो आणि बापुंचे पोस्टर बघायचो  तेव्हा आणखीनच स्फुरण चढत होते.  त्यात आमचे काही सिंह त्या बापूंच्या फोटो कड़े बघून salute करत होते. सर्व शहराने जणू दिवालिची शाल पांघरलेली  होती, त्यात सकाळी सकाळी radio FM वर अनिरुद्ध लोक सम्पर्क साठी लागलेले  spots(सूचना) दिवसातून प्रत्तेक तासाला लक्ष वेधून घेत होते.
असा तो क्षण २ दिवसांवर येउन ठेप्पला होता. मराठवाडा सांकृतिक मंडळाला तर एका भव्य नगरी चे स्वरुप आलेले  होते. परेड डीएम् व्ही  च्या आवाजाने सर्व परिसर दणाणून जात होता. कारण या ऐतेहासिक शहराला हे सर्व नवीन होते, पण या नगरीत पडणारे ते पावुल  जुनेच होते, त्याच्या पावुल खुणा  आज ही जुन्या लोकांच्या मनात घर करून आहेत.

१२ दिसम्बर २०१०, २ वाजून ५५ मिं, पहाटे 


रात्रि ११ दिसम्बर ला जेव्हा सर्वांना कळाले, की बापू रेल्वेने येत आहे, पहाटे, तेव्हा तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला, कारण आपल्या लाडक्या अनिरुद्ध ला बघण्यासाठी आणि स्वागतासाठी  काहीही बंधन कोणी ठेवले नव्हते, आणि त्या प्रमाने सर्व वानर सैनिक ठरलेल्या रेल्वेस च्या २ तास वेले आधी स्टेशन वर जून बसलेले. आनखिन एक गम्मत म्हणजे, तिथे एक ही जन बिना प्लाट फॉर्म  टिकिट शिवाय आत  गेलेला नव्हता. मी जेव्हा टिकेट खिड़की वर २७ प्लाटफॉर्म टिकेट मागितले तेव्हा तो अवचित होवून माझा कड़े बघत होता, आणि मी त्याच्या चेहरया वरच्या  भावाकडे बघून हसत होतो. आज पर्यंत च्या औरंगाबाद च्या इतिहासात तरी अशी नोंद नाही की १५००+ प्लाटफॉर्म  टिकेट  कोणी काढलेली होती ति पण एकाच दिवशी एकाच मानसा साठी.  पहाटे ३ वाजता  तर स्टेशन ला एक जत्रेचे स्वरुप आलेले होते.

कृष्णदेवरायाची देवगिरी
वाट बघतेय तुझी
अनिरुद्ध सख्यारे
लवकर ये दारी  

तुझा पद स्पर्शा साठी
व्याकुळली आहे खडकी
आलिंगन देण्या साठी
सखा वाट पाहे घ्रुश्नेश्वरी 

तो क्षण जवळ येत होता, स्पीकर वरुण अनौन्समेंट होत होती, देवगिरी एक्सप्रेस ने आपला बापू येत होता, औरंगाबादच्या आधीचं येताना, कृष्णदेवरायाची देवगिरी ने बापून्ना एका बाजुने  सलामी दिली, तर एका बाजूने सातारयाच्या डोंगराणे; स्पीकर वरुण अंतिम घोषणा झाली, कुछ ही देर मी देवगिरी एक्सप्रेस आ रही है, आपले सर्व कार्यकर्ते, एका रांगेत दर्शना साठी उभे होते, त्या प्लाटफॉर्म वरुण तर बाहेरच्या दरवाजा पर्यंत सर्व काही अगदी शिस्तीत.
आपले सर्व मुख्य कार्यकर्ते ठराविक बोगी च्या ठिकाणी उभे होते, पण गम्मत म्हणजे, बापू ज्या डब्यात बसले होते तो दबा येउन थांबला २ डब्बे आलिकडे, मग हा क्षण कोण  बरे सोडणार, बापू खली उतरले,  आणि तिथे असलेल्या १-२ लहान सिन्हान्नी त्यांचा हात जावून धरला. तेवढ्य तिथे आम्ही सर्व पोहोचलो आणि  बापून्ना मानवी साखली ने व्यापून टाकले.
सर्व परिसर नंदा रमना अनिरुद्ध  आणि अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त च्या नावाने दनानुन गेला होता, वेळ होती ४.३० पहाटे.
स्टेशन वरचे सर्व जन विचारत होते कोण आहेत हे, सर्व विदेशी पर्यटक  औत्सुक्क्याने फोटो काढत होते.
आपल्या बापूने कोणालाच  निराश नाही केले, अग्द्दी प्रत्तेकला हरी ॐ करुनच बापू स्टेशन च्या बाहेर गेले. ब्रह्म मुहुर्तावर साक्षात्  परब्रह्म अवतरला होता.

गोड तुझे रूप रे
गोड तुझे नाम
लंकेवर सेतु बाँधाया
तयार आहेत राम नाम




१२ दिसम्बर २०१०, दुपारी १.०० 

सर्व कार्यकर्ते ठरवून दिलेल्या वेले प्रमाने मैदानावर जमलेले होते. सर्व मैदान अनिरुद्ध सुगंधाने दरवालूं गेलेल होते. तो क्षण जवळ येत होते तसा सर्व जन आनखिन उल्हासित  होत होते. संध्याकाल ठीक ३ वाजून ५५ मिं ने कार्यक्रमाला सुरुवात झाली ती विजय मंत्राने, तदनंतर श्री गुरुक्षेत्रम मन्त्र. आणि नंतर सुरु झाले ते अनिरुद्धाचे गान,

|| सुखद व्योम
झर बरसत आले
आनंदाचे सुर
ऐक रे अनिरुद्धा चे गाण ||

अस्से वेगवेगळे अनिरुद्दह्चे गान सुरु होते, आणि मैदानावर भक्तांची रिघ सुरु झालेली होती, ५ वाजून १५ मिं ने, आपल्या कोल्हापुर मेडिकल कैंपची विडियो क्षण चित्रे सुरु झाली, आपल्या लोकांसाठी हे जून होते, पण इथे जमलेले आर्धे भक्तगण हे नवीन होते, सर्वजन उत्सुकतेने संस्थेचे कार्य जाणून घेत होते. त्या नंतर AADM ची विडियो क्षण चित्रे सुरु झाली, तिथे उपस्थित भक्तगण सर्व पाहून उत्सुकतेपोटीसगळ्या डीएमव्ही  ना माहिती विचारत होते. 

बावन्न दरवाजी गाव आमुचे
त्रेपन्नावा तुझा साठी
सज्ज्ज आहे औरंगाबाद नगरी
तुझा पद-स्पर्शासाठी

आता खूप जालिया मस्करी
हसतोस कारे हरी
वानर सैनिकाचे अपराध
पोटात घालुनी लवकर येरे दारी 

सदानंदसिंह वर्तक यांनी स्पीकरवर जसे जाहिर केले की सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांचे या परिसरात आगमन झाले आहे, सर्व परिसर जल्लोशाने उजलुन  गेला. थोड्या वेळातच आपल्या लाडक्या सद्गुरुंचे स्टेज वर आगमन झाले, आणि तेव्हा हा जल्लोष आणखीनच वाढला.  आल्या आल्या बापूने महिषासुरमर्दिनिला वंदन केले.
इकडे सर्व परेड ड़ीएम्व्ही  शिस्तीने रांगेत उभे होते, तिकडून घोषणा झाली आता अनिरुद्धाचे ड़ीएम्व्ही  सद्गुरूंना मानवंदना देण्यास सज्ज आहेत, तेव्हा एक जोरात आवाज आला, अनिरुद्ध पथक सावधान.... अनिरुद्ध पथक.... दैनेसे तेज चल..
आणि सर्व प्लाटून १ -२ एक दो करत पुढे सरकू लागल्या, सोबत साथ होती ति सुरेख ड्रम्स ची; पहिल्यांदाच मुंबई बाहेर अशी परेड होत होती आणि तो मान औरंगाबाद शहराला मिळाला.
बापू माइक कड़े वळाले, 
हरी ॐ
मी चांगला आहे की वाईट आहे - हे ठरविण्याचा अधिकार मी प्रच्छन्न मनाने सर्व जगाला देऊन टाकलेला आहे कारण मुख्य म्हणजे इतर कोण मला काय म्हणतात ह्याची मला जराही पडलेली नसते. फक्त माझा दत्तगुरु आणि माझी गायत्रीमाता ह्यांना आवडेल असे आपण असावे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे आणि त्यांच्याच वात्सल्यामुळे मी त्यांना पाहिजे तसाच घडत राहिलो आहे.
या मुख्य  मुद्द्याला अनुसरून बापू बोलू लागले, सर्वांशी चांगले वागल्या नंतर ही माणुस काही वाइट  घडल्या वर  नशिबाला दोष देतो. चांगले वागून काय उपयोग झाला याची खंत त्याला भेडसावते, आशा परिस्थिते मधे तो नैराश्येच्या गर्तेत अडकतो.
चुकांचा बावू  करू नका, परमेश्वरा बद्दल आदर बाळगा, जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल याचा विचार करून जगण्याच्या सवई मुले माणुस स्वतःची पारख  करण्याची क्षमता गमावून बसतो. जगाच्या प्रमाणपत्राने काही ही होते नसते, त्यासाठी खंबीरपणे ताकत मिळवावी लागते .
वाल्या कोल्याचा वाल्मीकि होवू शकतो मग तुम्ही का सुधारू शकत नाहित. कोणी आपली स्तुति केल्यास श्रीराम म्हणा, गुरुक्षेत्रम मंत्राचा जाप करा.
नंतर सुरु झाला तो गज़र,  विठुचा गजहर हरिनामाचा झेंडा रोविला, यावर जसा बपुन्नी ताल धरला तस्सा सर्व मैदान या गज़र मधे न्हावुन निघाले.
नंतर सुरु झाला तो दर्शन सोहला,सर्व भक्तगण स्टेज समोरून जात होते, हरी ॐ म्हणत होते, खूप जणांच्या डोळ्यात आनंदाश्रु होते, काही जन उल्हसने बापू बापू म्हणून "साद" घालत होते, आणि बापू त्यांना प्रतिसाद देत होते, त्या भक्ताच्या डोळ्यातले अश्रु बघून आपले काही कार्यकर्ते सुद्धा भावुक होत होते. तो क्षणच तसा होता. काही जन  हाताने खुनावुन जसे पत्र लिहिते बापू, अस्से सांगत होते, काही जन डोक्या वर मात्रुवास्ताल्याविन्दानाम घेउन येत होते, काही जन मंत्राचा जाप करत होते, कोणाच्या डोक्यावर लहान लहान बाळ होते, कोणाच्या हातात त्यांच्या आईचा हात होता, कोणी उड्या मारून कान पकडून बापूंना हरी ॐ म्हणत होते, कोणी विचारत होते बापू आईला आणि दादांना का नाहीस आणले , सगळ्यांच्या डोळ्यातले भाव बघण्या सारखे होते,
अहो अवघे पंढरपुर औरंगाबादेत अवतरले होते.

जीवनात आमुच्या
प्रसंगे येती फार
तू दाविलेल्या मधुफलवाटिकेवरुनी
जाण्यास आम्ही आहोत तयार 

तुला देण्यासाठी
फ़क्त शब्द आहेत रे माझ्याठाई
बहुत काय लिहु रे हरी
तू समर्थ आहेसी आमुचे मन जानन्या साठी

दादा आणि आईस कलवावे
शब्द हे सुदाम्याचे समजावे
तुझे सिंह आणि वीरा
वाट बघताहेत कलावे 

हरी ॐ 
मी अनिरुद्धाचा सिंह