|| पोर्णिमेच्या रात्रि निशिगंध बहरला
त्या शाम निळ्या शोधण्या सुगन्ध दरवलला
भासाने त्याच्या चोहीदिशा भरकटला
अनिरुद्ध समजुन मोरपिसा बिलगला ||
|| मोरपिस खुदकन हसे निशिगंधाला
गालात हसून सांगे त्या निरागसाला
अनिरुद्धा भेटावे वाटत असे
तर,
आधी शोध स्वप्नगंधाला .. ||
|| निशिगंध आमचा भोळा
याला अनिरुद्धाचा लळा
कोणी म्हणे हा नीळा कोणी म्हणे सावळा
अहो ह्याची मस्करी करे माझा अनिरुद्ध भोळा ||
|| आई माझी स्वप्नगंधा
वसे निशिगंधाच्या सुगंधा
जणू मृग धावे कस्तुरीच्या मागा
निशिगंध धावे स्वप्नगंधाच्या मागा ||
|| नकळत मातीचा सुवास दरवळला
का जाने उदिचा भास जाहला
निशिगंध वळले तया दिशेला
अहो,
माझ्या बापूने औरंगाबादी हरिगुरुग्राम दाविला ||