कृष्णदेवरायाची देवगिरी
वाट बघतेय तुझी
अनिरुद्ध सख्यारे वाट बघतेय तुझी
लवकर ये दारी
तुझा पद स्पर्शा साठी
व्याकुळली आहे खडकी
आलिंगन देण्या साठी
सखा वाट पाहे घ्रुश्नेश्वरी
सप्ताश्वारुढ़ होवूनी
लवकर धावरे हरी
तुझा दर्शनासाठी
सिद्ध जाहलिए प्रतिष्ठान नगरी
डावलूनी माँउली ऐतिहासी
चुक झालिया रे हरी
श्रीखंडया बनुनी आलासी
तरी ओलखता नाही आले तये वेळी
गोड तुझे रूप रे
गोड तुझे नाम
लंकेवर सेतु बाँधाया
तयार आहेत राम नाम
जीवनात आमुच्या
प्रसंगे येती फार
तू दाविलेल्या मधुफलवाटिकेवरुनी
जाण्यास आम्ही आहोत तयार
आता खूप जालिया मस्करी
हसतोस कारे हरी
वानर सैनिकाचे अपराध
पोटात घालुनी लवकर येरे दारी
बावन्न दरवाजी गाव आमुचे
त्रेपन्नावा तुझा साठी
सज्ज्ज आहे औरंगाबाद नगरी
तुझा पद-स्पर्शासाठी
तुला देण्यासाठी
फ़क्त शब्द आहेत रे माझ्याठाई
बहुत काय लिहु रे हरी
तू समर्थ आहेसी आमुचे मन जानन्या साठी
दादा आणि आईस कलवावे
शब्द हे सुदाम्याचे समजावे
तुझे सिंह आणि वीरा
वाट बघताहेत कलावे
-- अभिजीतसिंह