..

बापुंची वचने 1)अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण,तयासी कैसा भय दुःख भार 2)श्रद्धावान हाची माझा मित्र सखा,तयासी मी रक्षिन देवयान पंथी 3)ग्रंथराज हाची जयाचे अनुसंधान,तयाचा योगशेम मीची वाहे 4)जान मी न कधी टाकीन तुजसी,देईन नित्य मनः सामर्थ्य बल बुद्धि 5)मर्यादा हाची जयाचा तारक मार्ग,तयाचा मी आश्रय सर्वकाळ 6)जो जो मज स्मरे दृढ़भावे,तयासी आनंदघन देईन मी 7)मज सवे जो प्रेमे येइल,तयाचे अशक्य शक्य मी करीन 8)तू वानर मी मित्र तुझा खचित,रावण मरणार जान तू निश्चित 9)जेथ सेवा भक्ति शारन्य राहे,तेथ तेथ दाऊ नंदा अनिरुद्ध राहे

Wednesday, July 7, 2010

अनुभव- विनीतावीरा गोरे

बाप्पांचे तर भरपूर अनुभव आलेत, पण माझा आजीचा अनुभव सांगते मी.
माझ्या आजीला चालता येत नव्हते. मी रोज आजीच्या पायाला बाप्पांची उदी लावायची
आणि बापूंचा मंत्र बोलून घ्यायची "ओम मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः " हा माझा रोज सकाळचा उपक्रम असायचा.
एक दिवस माझी आई आणि पप्पा श्री दत्त क्लिनिकला जाऊन आले. आजीचा प्रोब्लेम सांगितला पण सूचितदादांनी सांगितले की एकतर पेशंट नाही तर रिपोर्टस ह्या पैकी काही तरी एक आणा. परंतु आजीला तिकडे नेणे शक्य नव्हते आणि आजीची ट्रीटमेंट आमचे फॅमिली डॉक्टर करायचे.
मी त्या दिवशी आजीला रात्रीपण उदी लावली आणि मंत्र पण बोलून घेतला आणि आजी झोपली. सकाळी मी आजीला परत उदी लावली आणि मी क्लासला गेली, क्लासला जाऊन आली तेव्हा आजी एकटी बाहेर बसलेली मला वाटले कि आईने आजीला बाहेर बसवले, पण जेव्हा आईला विचारले तेव्हा आई म्हणाली कि मी तर कामात होती मी नाही आजीला बाहेर बसवले... जेव्हा आजीला विचारले तर ती म्हणाली की "रात्री कोणीतरी ( आपले बाप्पा ) माझ्या पायावर आणि डोक्यावर हात फिरवला आणि बोलले कि तू उद्या पासून एकटीच चाल, म्हणून मी स्वःताच उठून चालण्याचा प्रयत्न केला बापूंचा नाव घेऊन आणि मला खरच काही त्रास नाही झाला चालताना, आणि बळ द्यायला बापू होतेच ना."
आजीचे हे शब्द ऐकून मला एवढा आनंद झाला मनात बापूंचा जप अखंड चालूच होता.
खरच बापू आपल्या भक्तांना अशीच अनुभूती देवो.
हरी ओम
- विनिता गोरे