॥ हरि ૐ ॥
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरी या ।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्व काळ ॥१॥
विठु माऊलीये हाची वर देई ।
स॑चरोनी राही ह्रुदयी मझ्या ।
तुका म्हणे काही न मागो आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥२॥
गोड तुझे रुप गोड तुझे नाम.
गोड तुझे रुप गोड तुझे नाम.....