4 may 2010
६ मे २०१० रोजी प.पू. बापूंचे रामराज्यावरिल विशेष प्रवचन होणार ही बातमी गेल्या १५ दिवसांपासून सर्वत्र ऑरकुट, फेसबुक वर येत होती कंपनी मधे सीज़न असल्या मुले सुट्टी भेटेल का नाही याची खात्री नवती। काही झाले तरी यावेलेस चे प्रवचन सोडायचे नाही अशे ठरवलेले होते , शेवटी लीव कार्ड वर लीव भरली आणि खिशात रेसिग्न लैटर ठेवले आणि बॉस समोर कार्ड ठेवले, मनात बापू बापू बापू हेच जप सुरु होता, चुकून बॉस लाच म्हनलो
मी : बापू , २ दिवस सुट्टी हावी आहे . . i mean boss need a couple of days leave..
बॉस : हसून, लड़की देखने जा रहा है क्या?
मी : नहीं सर थोडा काम है
बॉस : ४ तारीख है KPI कौन भरेगा, break down आया तो कौन है? , वो PID का क्या हुआ, siemens वाला कब आ रहा है?
त्याचे नेहमीचे रडगाने सुरु झाले
मी [मनातल्या मनात शांत पने ] : याच्या डोक्यात आधी तो LAPTOP घालावा, आणि मग resign letter द्यावे।
पण तेवढ्यात काय चमत्कार झाला काय माहित,
बॉस : ठीक है, i've sent email for todays pending job, do it and then go.....
मी : चला कमीत कमी २ दिवस डोक्याला तान नाही
6 may, २०१०
साधारण संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास नेहमीच्या थाटात प. पू. बापू, प. पू. नंदाई आणि प. पू. सुचितदादा यांचे सह परिवार आगमन झाले.
बापूंच्या चरणावर, पुष्प व्रूसटी केलि बापू गोड हसत पुढे चालले होते, मागुन जोरात आवाज दिला, ओ बापू ऊऊ ... बापू मागे पाहून हसले, आधीच आनंदाने हर्शौल्हासित होनाऱ्या मनात मधाची भर पडली
काही वेळातच बापूं स्टेजवर आले आणि पोडियमवरुन प्रवचनास सुरुवात केली.
हरि ओम
प्रथम स्मरण केले - १) गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु....२) अनसूया अत्री संभूतो....३) सर्व मंगल मांगल्ये...
हरि ओम
सुरुवातीला बापूंनी १४, सप्टेंबर २००० रोजी केलेल्या विशेष प्रवचनाची आठवण करुन दिली. या प्रवचनात बापूंनी पहिल्यांदा "मी"चा पाढा वाचला होता. यात बापूंनी स्पष्टपणे स्वतःबद्दल संपूर्ण माहिती दिली होती. जन्म कुठला?, शिक्षण कुठे कसे झाले?, आई वडिल कोण? हे सर्व सांगितले होते. मी अनिरुद्ध आहे. डा. अनिरुद्ध धैर्यधर जोशी...हे पुन्हा ठासून सांगितले. त्यावेळी २०२५ रामराज्याचा उल्लेख देखील केला होता आणि "हे माझं स्वप्न, ध्येय व ब्रीद आहे" हे बापूंनी आज पुन्हा सांगितले.
बापू उवाच : आज जो मी येथे उभा आहे तो ते हे रामराज्य कसे येते? कसे येणार आहे? ते सांगणार आहे. २.३० तासात बोलणार आहे. हे सर्व सांघिक पातळीवर करायचे कार्यक्रम आहेत. सांघिक पातळीवर ८ आक्टोबर २०१०, अश्वीन नवरात्र पासून या कार्यक्रमांना सुरुवात होईल. वैयक्तिक पातळीवर उद्यापासून सुरुवात करता येईल.
रामराज्य म्हणजे नक्की काय?
जे राज्य रामाने अयोध्येत चालवले. अयोध्यातील रामराज्यातील नागरीक, समाज जसे होते तसे बनणे, बनविणे म्हणजे रामराज्य आणि हे तसे होणार १०८ टक्के. हे सांगताना बापूंनी रामराज्याच्या खुळचट कल्पनांना बगल दिली.
रामराज्य पाच स्तरांवर येणार आहे.
(१) वैयक्तिक स्तर - याचे दोन भाग आहेत. - १. प्रापंचिक आणि २. अध्यात्मिक
* सगळ्यातील सगळे बेस्ट म्हणजे रामराज्य. नुसते बेस्ट नव्हे त्र बेस्टेस
(२) आप्त स्तर - याचे दोन भाग आहेत. - १. प्रापंचिक आणि २. अध्यात्मिक
जे माझे आहेत. माझी family त्यांच्यासाठी. येथे nuclear family नाही. तर भारतीय संस्कृतीनुसार संपूर्ण कुटुंब स्तरावर रामराज्य आणणे.
(३) सामाजिक स्तर - याचे दोन भाग आहेत. - १. भौतिक/स्थूल/वैद्न्यानिक २. नैतिक
समाजात रामराज्य आले पाहिजे.
(४) धार्मिक स्तर - याचे दोन भाग आहेत. - १. धार्मिक शिक्षण २. सामूहिक/वैयक्तिक स्तर
१. धार्मिक शिक्षण - म्हणजे धार्मिक शाळा काढायच्या नाहीत. तर, स्वतःच्या उन्न्तीचे शास्त्र.
२. सामूहिक/वैयक्तिक स्तर - सामाजिक स्तरावरील आपापली धार्मिक जबाबदारी पार पाडणे
(५) भारतवर्ष/जागतिक स्तरावर -
भारतवर्ष म्हणजे भारत देश, India म्हणून नाही. तर महाभारत आहे. महाभारत म्हणजे कौरव पांडवांचे महाभारत नाही. खरा खुरा महा भारत. ज्याच्या सीमा विस्तृत असतील. आजची भारताची साईज ही भारतवर्षच्या १ तृतीयंश आहे.
Bharatvarsh will be THE LEADER.
मग यासाठी आम्हाला काय करायच. हे बापूंनी सांगितले.
वैयक्तिक स्तरावर
१) दररोज सकाळी उठल्यावर दात घासल्यानंतर जलप्राशन करणे अर्थात पाणी पिणे.
सुरुवात ५० मिली पाण्याने करायची. दीड महिन्यात ३०० मिलि, तीन महिन्यात ६०० मिली, पुढे ९०० ते १००० मिली म्हणजेच १ लिटर. कोमट पाणी प्यायचे आहे. ना जादा गर्म और ना जादा थंडा पानी. शांतपणे पाणी प्यायचे आहे. गटागटा नाही. त्यानंतर अर्धातास चहा, काफी, सिगरेट, शिरा, असं काहीही खायचे नाही. यालाच water thearphy (जलचिकीत्सा) असे म्हणतात. यामुळे शारिरीक, मानसिक आजार होत नाही. आळस येत नाही, रागीटपणा येत नाही, कार्यक्षमता वाढते. हे सांगतान बापूंनी पेला ही दाखवला. २०० मिलीचा. या अशा पेल्यातून पिण्यास सुरुवात करायला सांगून मापपणे दाखविले. हे करताना कंटाळायचे नाही असेही सांगितले. कोल्ड्ड्रींग शक्यतो टाळण्याचा सल्ला दिला. त्यात पाण्याचे पूर्ण प्रमाण नसते.
आम्हाला उठल्यावर चहा लागतो. चहाशिवाय आमचे चालत नाही. किक लागत नाही. हे मुर्खपणाचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. कारण यातील canin हे द्रव्य अत्यंत घातक आहे. ते कसे हे सांगितले.
२) दात घासल्यानंतर आणि पाणी पिण्याच्या आधी मिठाच्या पाण्याने चूळ भरणे, गुळण्या करणे.
झोपताना बराच काळ तोंड बंद असल्याने तोंडात bacteria तयार होतात. त्यामुळे तोंडाला वास येतो. शरीर, मन, प्राण, बुद्धीने आरोग्य चांगले रहावे यासाठी हा आणि असे अनेक गोष्टी बापूंनी सांगितल्या.
३) काही अंतराने थोडे थोडे पाणी पित रहा.
कमीत कमी २५०० ते ३००० मिली तर जास्तीत जास्त ४००० मिली (यापेक्षा जास्त नाही) पाणी प्यावे. यामुळे शरिर, मन, सार्याचेच आरोग्य राहते.
४) सूर्यप्रकाश
सूर्यप्रकाश घ्यावा. कमीत कमी अर्धा तास रोज सूर्यप्रकाश घ्यावा. हे जमले नाही तर आठवड्यातून साडेचार तास घ्यावा.
शक्यतो दुपारी १ ते ३ ही वेळ टाळा. सुर्योदापासून १ पर्यंत व ३ पासून सूर्यास्तापर्यंत सूर्यप्रकाश घ्यावा. सूर्यप्रकाश हा मूळ उर्जा स्त्रोत आहे. त्यातुन उर्जा मिळते. सुर्यप्रकाशात सारे जीवन आहे.
५) फळ खाणे
फळ हे मानवाचे प्रमुख अन्न आहे. फळ खाण्याने स्त्री-पुरुषांन आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात.
सकाळी नाश्ता नंतर व रात्री जेवणानंतर फळे खावीत. साली सकट खाणे. ज्यांना फळे परवड्णार नाही त्यांनी स्वस्त मिळणारी फळे खावीत.
फळांबाबत सांगताना बापूंनी माश्यांबद्द्ल (sea food) ही सांगितले. त्यांनी shallow fry करण्याचा सल्ला दिला. यात असणार्या शरिरावश्यक द्रव्यांबद्द्ल माहिती दिली.
६) अध्यात्मिक
१. आह्निक कमीत कमी १ वेळा
२. गुरुक्षेत्रम मंत्र जास्तीत जास्त वेळ
३. श्रीमद्पुरुषार्थचे किमान एक पान वाचणे
४. रोज रात्री झोपतान सर्व कुटुंबाने एकत्र हनुमान चलिसा ३ वेळा म्हणणे.
ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत. ह्या करायच्याच. ह्या व्यतिरिक्त जो तो आपल्या उपासना करू शकतो.
७) शताक्षी प्रसादम
शताक्षी म्हणजे महिषासुरमर्दिनीचे एक रुप. त्या रुपाचा, आईचा प्रसाद
कृती : सकाळी नाश्ता झाल्यानंतर हळद, मध, १ चतुर्थांश लसूण (ठेचलेली), सुंठ या मिश्रणाची छोटी गोळी बनवायची.
हातावर ठेवायची. तीनदा अनिरुद्ध म्हणायचे आणि मग गिळून टाकायचे. हा प्रसाद जरी भौतिक असला तरी तो मनावर, बुद्धीवर आणि प्राणावर कार्य करणारा आहे. प्रत्येक कमकुवतपणा दुर करण्याची ताकद यात आहे.
८) कडीपत्ता
कडीपत्त्याची पाने पाच ते सहा कच्ची किंवा जेवणात चावून चावून खावी. असे केले असता वर्षभरात कर्करोगाच्या पेशी जन्मल्यावरच हतबल करण्याची शक्ती असते. breast cancer आणि blood cancer मध्ये कडीपत्ता ५० टक्के परिणामकारक आहे. तर इतर कर्करोगात ८० टक्के. त्यामुळे कडीपत्ता खाण्यावर बापूंनी खूप जोर दिला. म्हणूनच नैवेद्यात कडीपत्ता आणि मीठ याचा समावेश करण्यास बापूंनी आधिच सांगितलेले आहे.
९) block मध्ये राहणार्यांनी आपल्या gallary/ grills मध्ये तुळस, कडीपत्ता, मोगरा/गुलाब, आलं आणि झिपरी अशा पाच कुंड्या लावाव्यात. यामुळे घरात oxigen चे प्रमाण चांगले राहते. तसेच घराच्या जवळ कडुनिंबाचे झाड/झाडे हवीत. oxigen खुप वाढतो. डास आणि इतर किडे मरतात.
हे सर्व करणार नाहीत ते रामराज्यात नसतील किंवा रामराज्याच्या बाहेर जातील. असे बापूंनी सांगितले.
९) block मध्ये राहणार्यांनी आपल्या gallary/ grills मध्ये तुळस, कडीपत्ता, मोगरा/गुलाब, आलं आणि झिपरी अशा पाच कुंड्या लावाव्यात. यामुळे घरात oxigen चे प्रमाण चांगले राहते. तसेच घराच्या जवळ कडुनिंबाचे झाड/झाडे हवीत. oxigen खुप वाढतो. डास आणि इतर किडे मरतात.
हे सर्व करणार नाहीत ते रामराज्यात नसतील किंवा रामराज्याच्या बाहेर जातील.
१०) इंग्रजी - इंग्रजी शिकणे अत्यंत आवश्यक. इंग्रजी सुधारलच पाहिजे असा आग्रह धरला आहे. यासाठी ANIRUDDHA's INSTITUTION OF LANGUAGE AND LINGUISTICS ची स्थापना करण्यात आली आहे. भाषा आणि भाषाशास्त्र...
याच्या प्रमुख आहेत - सौ. स्वप्नगंधा अनिरुद्ध जोशी (नंदाई)
दर महिन्याला simple English मधुन १ मासिक निघेल. त्यात कठीण शब्दांच अर्थ त्या बरोबरअच दिलेला असेल. त्यामुळे Dictionary ची गरज भासणार नाही. याची संपूर्ण रचना नंदाईच करणार. उपासना केंद्रावर conversation group असतील. हा group English सुधारेल स्वतःचेही आणि इतरांचेही.
* रामराज्याचा प्रवास हा रामराज्याच्या स्टेशनपासूनच सुरु होतो. आणि रामराज्य म्हणजे ग्रामविकास. भारतात सात लाख खेडी आहेत. यामध्ये शहरातील झोपडपट्टया देखील आल्या.
शहरातील कार्यकर्ते आणि त्या जवळपासचे सामाजिक कार्यकर्ते यात सहभाग घेतील. ग्रामसेवेसाठी ज्याचे हातभार लागतील महिषासुरमर्दिनी त्याच्यासाठी प्रगटेल. यासाठी ANIRUDDHA's INSTITUTE OF GRAMIN VIKAS ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. याचे कार्य दोन भागात असेल.
१) प्राथमिक ग्रामविकास कार्य - चरखा, अन्नपूर्णा, गांडूळखत प्रकल्प, छोट्या छोट्या जमिनिंचा वापर करून घरगूती बाग बनविणे. स्वयंपूर्ण बनविणे, आरोग्य शिक्षण व प्रौढ साक्षरता.
२) माध्यमिक ग्रामविकास कार्य - जमिन व पावसानुसार फायदेशीर वृक्षारोपण, पशुपालन, जलसंधारण/जलसंचय, शेतीविषयक मार्गदर्शन, जोडधंद्याचे प्रशिक्षण (या सगळ्याचे विस्तृत माहिती दिली)
(या सगळ्याचे प्रात्याक्षिक असेल) यामध्ये पाच DIPLOMA COURSE शिकविण्यात येणार आहे.
ANIRUDDHA's INSTITUTE OF GRAMIN VIKAS चे
Dean - Sameerdada Dattopadhye,
Active Dean - Swapneelsinh Dattopadhye
* ANIRUDDHA's INSTITUTE ARTILLERY SOURCES OF ENERGY
- अपारंपारिक उर्जा स्त्रोत
१. चरख्यापासून वीज निर्मिती...
२. बायोगेस
३. पवनचक्की
ANIRUDDHA's INSTITUTE ARTILLERY SOURCES OF ENERGY चे
Dean - Sameerdada Dattopadhye,
Active Dean - Dr. Paurassinh Aniruddh Joshi
*THE EXPONENT GROUP OF JOURNAL
त्रैमासिक...
विषय - 1) IT, 2) MEDICAL, 3) MBA, 4) LAW FOR LAWYERS AND COMMON MAN, 5) SCHOOL TEACHERS, 6) SHARES AND STOCK MARKET
THE EXPONENT GROUP OF JOURNAL चे
Editor Dean - Sameerdada Dattopadhye,
Assi. Dean - Vaibhavsinh Tare
* ANIRUDDHA'S LABORATORY FOR POLLUTION
सर्व प्रकारचे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न...जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न
ANIRUDDHA'S LABORATORY FOR POLLUTION चे
Dean - Sameerdada Dattopadhye,
Active Dean - Dr. Paurassinh Aniruddh Joshi
*ANIRUDDHA's INSTITUTION OF SPORTS AND EXERCISE
Chief : Dr. Aniruddhasinh Joshi
Study n play..play n Study...
यानंतर बापूंनी श्री चण्डीका उपासना अर्थात श्री रामवरदायीनी सांगितले. यात "मातृवात्सल्यविंदानम" ग्रंथाचे जास्तीत जास्त वाचन करणे अपेक्षित आहे. यामुळे अशुभ गोष्टींचा नाश होतो. यास अपवाद नाही. यासाठी मात्र आवश्यक आहे १) तिच्या पुत्रावर असणारा विश्वास २)तिच्या चरणांशी शारण्य.
* संपूर्णपणे अतिशय पूर्णपणे स्त्री व पुरुष यांना पराक्रमी सैनिक बनविण्यासाठी प्रापंचिक आणी अध्यात्मिक पातळी वर बनविण्यासाठी व्रत....
स्त्रीयांसाठी "श्री मंगलचंडीका प्रपद्दी"
पुरुषांसाठी "श्रीरणचंडीका प्रपद्दी" (या बाबत विस्तृत माहितीसाठी या प्रवचनाच्या PDF/पुस्तीकेची वाट पहाणे योग्य ठरेल.)
सगळ्यात शेवटी बापूंनी श्री चण्डीका अभ्युदय सेनेची स्थापना केली आहे. संपूर्णपणे भारताच्या राज्यघटनेचा आदर राखुन युध्द प्रसंगी आवश्यक ती मद्त करण्यासाठी आणि होऊ शकणार्या तिसर्या महायुद्धानंतर पुनर्वसनाच्या कार्यात आघाडीवर असणारी ही चण्डीका आर्मी.
प्रत्येक दिशेने, प्रत्येक स्तरावर, प्रत्येक बाजूने, स्वतःची, स्वःधर्माची, स्व देशाची उन्नती करणारे सैनिक.
यात प्रवेश मिळविणे ही अत्यंत कठिण बाब असणार आहे. या सेनेचे COMMANDER IN CHIEF स्वतः ANIRUDDHSINH JOSHI असणार आहे. त्यांच्या इच्छेने, त्यांच्या कठोर परिक्षेनंतर यात प्रवेश मिळेल. कड्क शिस्तीचे पालन यात होईल. अत्यंत कडक....वय वर्षे २१ ते ५५. महिला/पुरुष दोघांनाही प्रवेश..
प्रवेश मिळाल्यास आई चण्डीकेच्या चरणांवर हात ठेऊन बापूंच्या समक्ष शपथ घ्यावी लागणार आहे. ही शपथ बापूंच देतील.
या प्रवचनात बापूंनी वरील सर्व अतिशय विस्तृतपणे सांगितले आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील असा विश्वास दिला. भक्ताची सर्वाथाने उन्नतीचा मार्ग सांगितला. आधुनिकतेची जोड देऊन पारंपारिक साधने, पध्दतींचे महत्त्व पटवून दिले.
जे सांगितले ते खरचं भन्नाट आहे. आगळं आहे. आपलच आहे. आपल्यासाठीच आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवनकार्य आहे....
हरि ओम
FOR मधुफलवाटिका